Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पात सोलरद्वारे विजेची ३० टक्के बचत

पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पात सोलरद्वारे विजेची ३० टक्के बचत

सोलरमुळे विजेची बचत करणारा हा पहिलाच प्रकल्प असा दावा

marathinews24.com

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत उभारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये सोलरद्वारे वीज जोडण्यात आली आहे. त्यातून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत असलेल्या गृहप्रकल्पामध्ये ३० टक्के वीज निर्माण होत आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या ४५ इमारतींमध्ये नेट मीटरिंगद्वारे महावितरण सवलत देत आहे. सोलरमुळे विजेची बचत करणारा हा पहिलाच प्रकल्प असा दावा पीएमआरडीने केला आहे.

औद्योगिक पट्ट्यातील २६ सराइत गुन्हेगार तडीपार – सविस्तर बातमी 

प्राधिकरणाच्या वतीने स्पाईन रस्त्यावरील भोसरी, सेक्टर १२ याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४५ इमारतींचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी जवळपास ४ हजार ८८३ सदनिका उभारण्यात आलेले आहेत. यात वन बीएचके ३ हजार ३१७ तर, टू बीएचके १ हजार ५६६ आहेत. दरम्यान, या प्रकल्पामध्ये सदनिकेच्या घरासमोरील जागा, वाहनतळ आणि जिना याठिकाणी ट्यूबलाइट आहेत. हे सर्व आता सोलर मीटरद्वारे जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण खर्चापैकी ३० टक्के बचत संबंधित सोसायटीची होत आहे. त्यामुळे दोन हजारांच्या आसपास येणारे वीजबिल हे ७०० ते ८०० पर्यंत आलेले आहे.

प्रती इमारतीत २ किलो वॅट क्षमतेची सिस्टीम

प्रत्येक इमारतीमध्ये २ किलोवॅट वीज जनरेट होईल, अशी सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत काही तक्रारी होत्या. मात्र त्यातील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर त्या सक्षमतेने सुरू करण्यात आल्या असून, संबंधित सर्व यंत्रणा पीएमआरडीएच्या आख्यारित सुरू असणार आहे. त्याबाबत विद्युत विभाग स्वतंत्र देखरेख ठेवत आहे. इमारतीत उभारण्यात आलेल्या या सोलर सिस्टिमद्वारे प्रत्येक सदनिकांमध्ये १०० लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यातदेखील सदनिकाधारकांच्या विजेमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. सद्यस्थितीत काही इमारतीमधील अद्याप सदनिकांमध्ये कोणी राहत नाही. त्यामुळे इतर सदस्यांना अधिक लिटर पाणी मिळत आहे.

यासंदर्भात कार्यकारी अभियंता संजय पाटील म्हणाले, सेक्टर १२ या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यात सर्व सोलर यंत्रणा कार्यान्वित झालेली आहेत. त्याचा फायदा सदनिकाधारकांना होत आहे. वीजबिलात ३० टक्क्यांहून अधिक बचत होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×