Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

पोलीस आयुक्तांनी फिरवली भाकर

marathinews24.com

पुणे – पोलिस दलातील सर्वाधिक मोठे असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्यारूपी भाकर फिरवली आहे. एकाचवेळी तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ तर उडाली आहेच पण खमंग चर्चा देखील सुरू आहे. अवैध धंदे, अवैध गोष्टी तसेच ड्रग्जप्रकरणात कडक भूमिका घेतलेली आहे. थोडी कानकून देखील कानावर येताच, त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या लक्ष घालून कारवाई केली जाते. त्यानंतरही शहरातील अधून-मधून अवैध गोष्टी सुरू असल्याचे समोर येते.

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची सव्वा ३ कोटींची फसवणूक

लोणी काळभोर पोलिस ठाणे, तसे आडबाजूला अन् वरिष्ठांपासून दूर पडते. त्यामुळे तेथील गडबडीबाबत वरिष्ठांना कळत नाही किंवा कळणार नाही, असा समज आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत लोणी काळभोरच्या हद्दीतून अवैध धंदे सुरू असल्याचे समोर आले होते. सातत्याने कारवाया, तसेच ड्रग्जविरोधातील कारवाई देखील झाल्या होत्या. याप्रकरणात या ना त्या कारणांने काही अंमलदारांचे संबंध समोर आले होते. त्यातच मध्यंतरी एसीबीची एक कारवाई देखील फसली गेली होती. अन्यथा एसीबीचा ट्रॅप सक्सेस झाला असता तर मोठी लक्तरे वेशीवर टांगली गेली असती. दुसरीकडे मध्यंतरी एका ‘झीरो’ला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन सखोल तपास केला होता. वरिष्ठांच्या समोर उभा केल्यानंतर त्या झीरीने घडाघडा माहिती समोर टाकत काहींची नावे घेतली होती.

यासर्व पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विशेष लक्ष केंद्रीत केले. तसेच, बुधवारीच अचानक एकाचवेळी पोलिस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. यानंतर पोलिस दलात मोठ्या चर्चेला उधान आले असून, एकप्रकारे भाकरी फिरवली गेल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

वरिष्ठांवरही विशेष लक्ष

पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांवर देखील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या माहितीत थोडीही गडबड मिळताच अचानक याच पद्धतीने मोठी कारवाई होईल असेही सांगितले जाते. दरम्यान, या सामूहिक बदल्यांमागे नेमके कारण काय, याबाबत अधिकृतरीत्या स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी, पाच वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्याने या बदल्या केल्याचे सांगितले जाते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×