Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

ऑनलाईन टास्क पडले ४४ लाखांना, तरूणीला गंडा

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

ऑनलाईन टास्क देउन सायबर चोरट्यांनी मारला डल्ला 

marathinews24.com

पुणे – ऑनलाईन टास्क देउन सायबर चोरट्यांनी तरूणीला अकाउंट उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचा विश्वास संपादित करून तब्बल ४३ लाख ९१ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना ३ ते ८ मे कालावधीत हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली आहे. याप्रकरणी रूचिता वीज वय ३८ रा. मगरपट्टा, हडपसर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रूचिता हडपसरमधील मगरपट्टा परिसरात राहायला असून, ३ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत चॅट करून विश्वास संपादित केला. त्यानंतर कमी वेळेत जादा पैसे कमविण्यासाठी ऑनलाईन टास्क देउन अकाउंट उघडण्यास सांगितले. त्यानुसार काही दिवसांनी सायबर चोरट्यांनी रूचिताला युपीआयडीसह बँक खात्यावर रक्कम पाठविण्यास सांगितले. अवघ्या पाच दिवसांत तिने तब्बल ४४ लाख रूपये संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केले. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रूचिताने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने साडेनउ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी महिलेला ९ लाख ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२४ कालावधीत धायरी रस्ता नर्‍हे परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×