Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

ट्रेडींगमधील परताव्याचे आमिष पडले ५५ लाखांना

शेअर्समधील गुंतवणूक पडली महागात

मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला तब्बल ५५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना फेबु्रवारी ते मे २०२५ कालावधीत वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची बतावणी, २५ लाखांना गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडीत राहायला असून, २३ फेबु्रवारीला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क केला. त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर लिंक पाठवून धानी सिक्युरिटी अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने त्यांचा विश्वास संपादित केला. त्यांच्याकडून ५५ लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

तरूणाला १५ लाखांचा गंडा

सायबर चोरट्याने तरूणाला प्रीपेड टास्क देउन ते पुर्ण करण्याच्या बदल्यात जादा परतावा देतो असे सांगून ऑनलाईनरित्या १५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ९ ते १४ एप्रिल २०२५ कालावधीत औंधमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×