पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची बतावणी, २५ लाखांना गंडा

पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची बतावणी, २५ लाखांना गंडा

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फेडेक्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगितले. संबंधित पार्सल कस्टम विभागात अडकल्याचे सांगून, एनसीबी विभागाद्वारे कायदेशीर कारवाई करण्याची भीती दाखवून २५ लाख ३७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२५ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मनी लॉड्रींगच्या केसच्या बतावणीने लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, ५ ऑगस्ट २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. फेडेक्स कंपनी मुंबईतून बोलत असल्याचे सांगून, तक्रारदाराचे पार्सल कस्टममध्ये अडकल्याचे सांगितले. पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असून, खोटी कागदपत्रे आढळून आली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, एनसीबी विभागाद्वारे कायदेशीर कारवाई होउ शकते, अशी भीती सायबर चोरट्याने घातली. तक्रारदाराचे बँक खाते स्कॅनिंग करण्याच्या बहाण्याने २५ लाख ३७ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

तरूणाला टास्कचे आमिष पडले २५ लाखांना

प्रीपेड टास्कद्वारे सायबर चोरट्याने तरूणाला तब्बल २५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ९ ते १५ मार्च २०२४ मध्ये बाणेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायबर चोरट्याने तरूणाला प्रीपेड टास्क देउन ते पुर्ण करण्यासाठी आमिष दाखविले. त्याबदल्यात त्याच्याकडून वारंवार पैसे वर्ग करून घेतले. २५ लाखांवर रूपये वर्ग झाल्यानंतर तरूणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×