शस्त्राच्या धाकाने बुलेट विक्री दालनातील ७ लाखांची लूट

शस्त्राच्या धाकाने बुलेट विक्री दालनातील ७ लाखांची लूट

वाकडेवाडी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी बुलेट विक्री दालनातील ७ लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात घडली. सुरक्षारक्षक इंद्रसेन जाचक (वय ४५, रा. बावधन) यांनी खडकी पोली ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातून एकाच वेळी १० गुन्हेगार तडीपार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी परिसरात ब्रम्हा मोटर्स बुलेट विक्री दालन आहे. जाचक तेथे सुरक्षारक्षक आहेत. मंगळवारी पहाटे दोन चोरटे दालनात शिरले. त्यांनी जाचक यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. दालनातील कप्पा उचकटून चोरट्यांनी ७ लाख ११ हजार रुपयाची रोकड लुटून नेली. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चाेरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

उत्तमनगर, नऱ्हे भागात घरफोडी

पुणे -उत्तमनगर आणि नऱ्हे भागातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, लॅपटाॅप, मोबाइल असा एक लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे खडकवासला परिसरातील कुडजे गावात राहायला आहेत. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. मंगळवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून लॅपटाॅप, दोन मोबाइल दूरचित्रवाणी, कागदपत्रे असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे नऱ्हे भागातील साई काॅम्प्लेक्स सोसयाटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून लॅपटाॅप, मोबाइल, दूरचित्रवाणी संच असा मुद्देमाल लांबविल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. तक्रारदार हे गावाला गेले होते. गावाहून परतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×