Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मुलींसह महिलांचे अपहरण करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला बेड्या

मुलींसह महिलांचे अपहरण करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला बेड्या

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलींसह महिलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करीत लैगिंक अत्याचार करणार्‍या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार ( वय ५० रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल आहेत.

बारामतीजवळ अवैधरित्या २ हजार २९५ लिटर गावठी दारूसाठा जप्त – सविस्तर बातमी 

लोणावळा परीसरातील क्रांतीनगर हनुमान टेकडी परिसरात लुटमार करणार्‍या टोळीला तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सप्टेंबर २०२३ स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलिसांनी अटक केली होती. अल्पवयीन मुलींसह महिलांना पळवून आणून त्यांना डांबून ठेवले जात होते. त्यांच्यावर लैिंगक अत्याचारही केले जात असल्याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून दोघांना पथकाने अटक केली होती. राज सिदधेश्वर शिंदे (वय २५) आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (वय ४१ रा. दोघेही रा. कुसगाव, ता. मावळ) यांना अटक केली होती. टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम पवार पसार झाला होता. त्याने महिलेस चाकूचा धाक दाखवून पळवून नेत तिच्याकडील मोबाईल घेउन मारहाण केली होती.

आरोपी बेताब उर्फ शिवम याच्याविरूद्ध तीन राज्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्यासह जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. तसेच तो दोन वर्षापासून फरार होता. तपासादरम्यान तो कलबुर्गी कर्नाटक येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा पोलिसांचे पथक कलबुर्गीला गेले. आरोपी बेताब उर्फ शिवम याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, तुषार भोईटे, सागर नामदास, रईस मुलाणी, राहुल चोरगे, संतोष साठे यांनी केली

सराईतावर ३ राज्यात गंभीर गुन्हे

आरोपी बेताब उर्फ शिवम पवार पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध पुणे ग्रामीण जिल्हयात ४ गुन्हे, गुजरात राज्यात २ गुन्हे, कर्नाटक राज्यात एक गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये अपहरण व जबरी चोरीचे गुन्ह्याचा समावेश आहे. गुन्हयांमध्ये फरार होण्यासाठी तो वेगवेगळया राज्यात जावून अटकेपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. तो साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर बाहेर आला होता, तो पुन्हा कारागृहात हजर झाला नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×