Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बारामतीजवळ अवैधरित्या २ हजार २९५ लिटर गावठी दारूसाठा जप्त

बारामतीजवळ अवैधरित्या २ हजार २९५ लिटर गावठी दारूसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १४ लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

बारामती – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने तालुक्यात १२ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर कालावधीत माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या २ हजार २९५ लिटर गावठी दारूसह वाहतूक करणाऱ्या ३ चारचाकी, दुचाकी वाहनांसह १४ लाख ९१ हजार ४०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे, कारवाईत १० आरोपींना अटक करून सहा गुन्ह्यांचा तपास करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली आहे.

माॅडेल काॅलनीत घरफोडी, ३ लाखांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी 

राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे पाहुणेवाडी व माळेगाव, खु. आणि तुकाईमळा माळेगाव खु. येथे एक टाटा कंपनीची चारचाकी मालवाहू गाडी व फिॲट कंपनीची पुण्टो वाहन हातभट्टी दारू वाहतूक व व्रिकीसाठी देतअसल्याची माहिती मिळाली. ढवळेमळा, पाहुणेवाडी, तुकाईमळा माळेगाव खु. याठिकाणी ११ सप्टेंबरला वाहनांची तपासणी केली असता, १ हजार ९१० लिटर अवैध हातभट्टी दारुसह एकूण ९ लाख ७० हजार रुपये किंमतीची दोन वाहने आणि ९ हजार ३०० रुपये किंमतीचा इतर मुद्देमाल असा मिळून ११ लाख ७० हजार ३०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काशिनाथ सुरेश चव्हाण ( रा.वरळेगाव पो. बोरामणी, ता. सोलापूर) आकाश नामदेव पवार ( रा. वडजी तांडा, ता. द.सोलापूर जि. सोलापूर) सुग्रीव अंकुश भंडलकर सीताराम अंकुश भंडलकर (रा.खांडज) नवनाथ सदाशिव गव्हाणे (रा.माळेगाव खु. ता बारामती) सागर अशोक गव्हाणे, दत्तात्रय विजय गिरे (रा. दानेवाडी, ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) यांना आरोपींना अटक केली आहे. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, सागर साबळे, मनोज होलम, जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे यांनी भाग घेतला. गुन्ह्यांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे करीत आहेत, असेही शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×