Breking News
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार

विजेचा शॉक लागून २८ वर्षीय महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मस्साजोग येथील महावितरण विद्युत केंद्रातील घटना

marathinews24.com

बीड – वीजेचा धक्का बसून २८ वर्षीय महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी ( दि. १८) सहा वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग महावितरण विद्युत केंद्रात घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का बसला आहे. त्यामुळे मस्साजोगसह परिसरात शोककळा पसरली आहे. अमोल लव्हाळे (वय २८ वर्षे रा. मस्साजोग ता. केज) असे ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शेत मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी करा-पणनमंत्री जयकुमार रावल – सविस्तर बातमी

अमोल लव्हाळे हे अविवाहित होते. ते गावचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी गेले असता, त्यांना धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांला शव्हविच्छदनासाठी केज येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. अमोल हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या पश्चात आई आहे. त्याच्या कुटुंबात फक्त आई आहे. वडील नसल्यामुळे घरातील उदरनिर्वाह करण्यासाठी कोणी नसल्यामुळे महावितरण प्रशासनाने अमोल लव्हाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी मस्साजोगसह पंचक्रोशीतील मित्र परिवाराने केली आहे. अमोल लव्हाळे यांच्या पार्थिवावर मस्साजोग येथे शुक्रवारी (दि. १९) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×