Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

प्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मेहुण्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – प्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना ढोले-पाटील रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाच्या मेहुण्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण धनराज खरात (वय ३१, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साहिल गौतम जगताप आणि रोहन निगडे (वय ३१, दोघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खरातने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण खरात हा डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याने एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता. खरात आणि तरुणीच्या प्रेमविवाहास कुटुंबीयांनी विरोध केला होता. खरात आणि आरोपीच्या कुटुंबीयांमध्ये वादही झाले होते. खरात याची पत्नी नुकतीच प्रसृत झाली होती. शनिवारी (९ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास खरात ढोले पाटील रस्त्यावर थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी खरातला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या खरातला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, हवालदार भागवत प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×