Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

स्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापा

फुरसुंगीत तरुणांच्या खुनाचा प्रयत्न; दोघे जखमी

गुन्हे शाखा युनिट दोन आणि अमली पदार्थ विरोधी पथक एकने केली कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.१२) अवघ्या एका तासात दोन ठिकाणी कारवाया केल्या आहेत. त्यानंतर जाग आलेल्या स्वारगेट पोलिसांनी सायंकाळी एक किरकोळ कारवाई केली. त्यामुळे स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांना नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हे शाखा युनिट दोन आणि अमली पदार्थ विरोधी पथक एकने कारवाया केल्या.

गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून जेष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

कारवाई करण्यात आलेले दोन्ही बेकायदा धंदे स्वारगेट परिसरात अत्यंत वर्दळीच्या परिसरात सुरू होते. पहिल्या कारवाईत गुन्हे शाखेने स्वारगेट बस स्थानकाजवळील कॅनॉल शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत नदिम शेख (वय ३८, रा. गुलटेकडी) आणि बाळासाहेब दगडू अवचटे (वय ६२, रा. मंगळवेढा, सध्या रा. डांगोचौक) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराच्या चिठ्ठ्या आणि साहित्य जप्त केल्या याप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. स्वारगेट अमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा रस्त्यावर एसटी कॉलनीजवळील सार्वजनिक शौचालयाच्या खोलीतून विदेशी मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला. तेथून ४७ हजार ४६५ रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. रजत दीपक गायकवाड (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन्ही कारवाया मंगळवारी दुपारी साडेबारा ते दीड या दरम्यान झाल्या. गुन्हे शाखेने हद्दीत दोन कारवाया केल्याचे कळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी सायंकाळी पाचनंतर मार्केटयार्ड परिसरातील ट्रक पार्किंग परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई केली. याठिकाणी रहीम अब्दुल रज्जाक शेख (वय ४३, रा. कोंढवा) हा ‘कल्याण’ नावाचा जुगार विनापरवाना चालवत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती?

दोन्ही कारवाया गुन्हे शाखेने केल्यानंतरच स्वारगेट पोलिसांनी सायंकाळी एक किरकोळ कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्यांची माहिती नव्हती का, की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते, अशी चर्चा परिसरात रंगली आहे. या धंद्यांना स्थानिक पोलिस यंत्रणेतील कोणाचे पाठबळ आहे का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×