Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून जेष्ठाची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – इंटेरियर आणि फॅशन डिझायनिंग कंपनीत गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ६६ वर्षीय व्यक्तीची तब्बल २६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२१ पासून मे २०२६ कालावधीत घडली आहे.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील स्मृतीनगर परिसरात राहायला आहेत. आरोपी अमित अगरवाल (रा. भांडारकर रस्ता) याने तक्रारदाराला इंडियन होम इंटेरियर अँड फॅशन डिझायनिंग नावाची नवी कंपनी सुरू करत असल्याचे सांगितले होते. या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, तसेच कंपनीत पाच टक्के शेअर्स आणि गुंतवणुकीवर वार्षिक २५ टक्के निश्चित परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आरोपीकडे १० लाख रुपये रोख आणि १० लाख रुपये बँक खात्यावर जमा केले. सुरुवातीला आरोपीने काही रक्कम परतावा म्हणून दिली होती. मात्र, त्यानंतर गुंतवलेले २० लाख रुपये आणि त्यावरील ६ लाख १५ हजार ८९० रुपयांचा परतावा अशी २६ लाख १५ हजार ८९० रुपयांची रक्कम परत न करता आरोपीने अपहार केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×