पुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खून

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक

भारती विद्यापीठ परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून सुनेने ८० वर्षीय सासूवर स्वयंपाक घरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. याप्रकरणी सुनेला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सुमन अण्णासाहेब शिंदे (वय ८२, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक, भारती विद्यापीठ परिसर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनुपमा संजय शिंदे (वय ६०) हिला अटक करण्यात आली. पोलीस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे पती संजय, विवाहित मुलगा, सून आणि सासू सुमन हे एकत्र राहायला आहेत. अनुपमाचे पती सेवानिवृत्त असून, विवाहित मुलगा नोकरी करतो. अनुपमाचा किरकोळ कारणावरुन सासूबरोबर वाद व्हायचा. मंगळवारी (१२ मे) अनुपमा आणि सुमन घरात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादातून अनुपमाने सुमन यांच्यावर स्वयंपाकघरातील सुरीने सासू सुमन यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कोडून घेतले. अनुपमाने कोंडून घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला. पोलिसांनी घराची पाहणी केली. शयनगृहात सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुमनला ससून रुग्णालयात दाखल केले. अनुपमाची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×