विकसित भारत अभियान अंतर्गत इंडियाना सक्षम उपक्रम
marathinews24.com
पुणे – विकसित भारत अभियान २०४७ यांच्या अंतर्गत साई बिज़नेस क्लब तर्फे इंडियाना–द कल्चरल बिझ या अनोख्या कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील सेनापती बापट रोड, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर च्या सभागृहात झाली. साई बिझनेस क्लबच्या संचालिका आणि इंडियाना उपक्रमाच्या मुख्य आयोजिका प्रो. डॉ. कृती वजीर यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी डॉ. जिदापा थावरीत, ॲड नीरा धाडगे, नीलेश पैठणकर, प्रज्ञा अत्रे, स्वाती नाटेकर, सन्मय पाटील, प्रशांत वाडेकर, रितू आगवकर, चैताली पारेक, वर्णिका भार्गव, शिवतेज शिंदे, अश्विनी यटिंगुड्डा, राधिका कौठा आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद – सविस्तर बातमी
इंडियाना–द कल्चरल बिझ हे व्यासपीठ भारतातील अव्वल ब्रँड्स (मालमत्ता, भागीदारी आणि कंपन्या) यांना एकाच सांस्कृतिक छताखाली आणणारी एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. या अनोख्या उपक्रमात भारतीय कला प्रकार, वारसा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती – जसे की नृत्य, संगीत, नाटक, हस्तकला आणि कथाकथन – यांचा वापर ब्रँड्सना सर्जनशील आणि प्रामाणिकपणे प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो. इंडियाना द्वारे साई बिझनेस क्लब हे केवळ नेटवर्किंग नसून ते सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली भारत निर्माण करण्याची एक चळवळ आहे. असे मत प्रो. डॉ. कृती वजीर यांनी व्यक्त केले.
विकसित भारत अभियान अंतर्गत इंडियाना भारताच्या समग्र विकासाच्या दृष्टिकोनासाठी एक उत्प्रेरक साधन म्हणून ओळख करत असून भारतीय ब्रँड संस्कृती-केंद्रित ब्रँडिंग आणि प्रचार मोहिमांद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा प्रचार करू शकतात. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय बनकर, श्रावणी चव्हाण आणि अंश द्विवेदी यांनी केले होते.























