Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी

चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची उपाययोजना

marathinews24.com

पुणे – ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३ हजार ५७४.९३ लक्ष रुपयाच्या पुरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्न – सविस्तर बातमी

पुणे जिल्हातील भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२५, १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६, व १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीचा संभाव्य पाणी टंचाई त्रैमासिक कृती आराखडा १ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५-२६ साठी ३ हजार ५६४.४० लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला होता, त्यानंतरच्या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक पार पाडल्या. नवनिर्वाचित सदस्यांनी पाणी टंचाई निवारणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या होत्या, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ७ मे २०२६रोजी पुरक टंचाई आराखड्यास मंजूरी दिली आहे.

एप्रिल २०२६ ते जुन २०२६ मंजुर पुरक टंचाई आराखडा व उपाययोजना निहाय माहिती पुढीलप्रमाणे आहेत. नवीन विंधन विहिरी घेणे, कुपनलिका -१०१५.२५ लक्ष रुपये, नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती १२२१.५१ लक्ष रुपये, विंधन विहीरीची विशेष दुरुस्ती- १४०.१७ लक्ष रुपये, टँकरने पाणी पुरवठा करणे-१४४.५० लक्ष रुपये, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे – २९२.७० लक्ष रुपये, विहीरी खोल करणे, गाळ काढणे-२६.८५ लक्ष रुपये, स्त्रोत बळकटीकरण उपाययोजना ७२४ लक्ष रुपये तसेच प्रगतीपथावरील नळ पाणी पुरवठा योजना पुर्ण करणे- ९.९५ लक्ष रुपये असा एकूण ३ हजार ५७४.९३ लक्ष रुपयाचा पुरक आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये ७३ टँकरने ७१ गावे व ३५८ वाडपावस्त्यांना पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच बधित पशुधन १३ हजार ४७३ इतके आहे, अशी माहिती श्री. पाथरवट यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×