Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समितीची बैठक संपन्न

marathinews24.com

मुंबई – राज्य सरकार लवकरच ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधिमंडळात मांडणार असून, या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख, सन्मान आणि विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांसोबतच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानांतर्गत आयोजित शिबिरांमधूनही प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा-भगवत प्रसाद मकवाना – सविस्तर बातमी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील लाखो महिला शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष योगदान देत असतानाही त्यांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. ही विसंगती दूर करण्यासाठी शासन महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणत असून, या कायद्यामुळे महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल. परिणामी शासकीय योजना, कर्जसुविधा, विमा संरक्षण, प्रशिक्षण आणि इतर लाभ त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे केवळ जनजागृतीचे माध्यम न राहता प्रत्यक्ष लाभ देणारे अभियान ठरले पाहिजे. शिबिरांमधून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण झाल्यास त्यांचा प्रशासनाशी थेट संपर्क वाढेल, तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेलाही गती मिळेल. समितीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

महिला शेतकऱ्यांच्या हक्क आणि ओळखीच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अंमलबजावणीसह विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिला शेतकरी सक्षमीकरण हा आगामी काळात राज्याच्या विकासाच्या अजेंड्यातील एक महत्त्वाचा विषय ठरणार असल्याचा विश्वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×