Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

खिडकीतून शिरुन दोन लाखांचे दागिने लंपास

खिडकीतून शिरुन दोन लाखांचे दागिने लंपास

वाघोली भागातील घटना

marathinews24.com

पुणे – स्वयंपाक घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कपाटातील १ लाख ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वाघोली भागात घडली. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदारांचे वाघोलीतील माळवाडी परिसरात बैठे घर आहे. १९ जून रोजी घर बंद होते. चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविले. २१ जून रोजी दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करत आहेत.

घराबाहेेर झाेपलेल्या एकाला लुटले

पुणे-घरासमोरील ओसरीवर झाेपलेल्या एकाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल , रोकड असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसरमधील माळवाडी परिसरात राहायला आहेत. अन्नपूर्णा हाॅटेलमागे त्यांचे घर आहे. तक्रारदार हे २० जून रोजी घरासमोरील ओसरीवर झाेपले होते. चोरट्यांनी मध्यरात्री तक्रारदाराला झोपेतून जागे केले. त्याला मारहाण करुन मोबाइल आणि रोकड असा ७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×