Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्या

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्या

तीन आरोपी जेरबंद

marathinews24.com

पुणे – दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकरणातील तीन आरोपींना काळेपडळ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. आकाश उर्फ आक्या अशोक भरेकर (वय ३३), संतोष बबन टकले (वय ३४) साहिल अर्जुन कचरावत (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. साहिल कचरावत याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हा २० जून २०२६ रोजी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ३६ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आकाश उर्फ आक्या भरेकर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संतोष टकले आणि साहिल कचरावत यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. घटनेनंतर संतोष आणि साहिल हे दोघे फरार झाले होते. दरम्यान, २२ जूनला ते येवलेवाडी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला.

आरोपी रिक्षाने बोपदेव घाटाच्या दिशेने जात असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून पाठलाग केला आणि दोघांनाही अटक केली. दरम्यान, मृत आकाश झांबरे आणि तिन्ही आरोपी एकत्र बसून दारू पीत होते. त्यावेळी झांबरेने आरोपींच्या कुटुंबीयांबाबत शिवीगाळ केली. त्यामुळे वाद निर्माण झाला. दारूच्या नशेत वाद चिघळल्याने संतापलेल्या आरोपींनी झांबरेला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×