Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात कडक बंदोबस्तात ‘नीट’ परीक्षा पडली पार 

पुण्यात कडक बंदोबस्तात ‘नीट’ परीक्षा पडली पार 

प्रत्येक परीक्षा केंद्रावर २० पोलीस कर्मचारी तैनात

marathinews24.com

पुणे – ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानंतर रविवारी पार पडलेल्या परीक्षेसाठी पोलिसांनी विविध केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक पीरक्षा केंद्रावर २० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते..नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली. परीक्षे दरम्यान अनुचित घटना घडू नये, तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी, यादृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.

तर हे विकलेच म्हणावे लागेल-खासदार अमोल कोल्हे – सविस्तर बातमी 

पुणे जिल्ह्यातील ३६, तसेच शहरातील २७ परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्राबाहेरील वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, गर्दीचे नियोजन पोलिसांनी केले होते. पोलिसांनी पालकांना परीक्षा केंद्रासमोर वाहने लावण्याबाबत सूचूना दिल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी समाज माध्यमातील घडामोडींवर लक्ष ठेवले होते. परीक्षा केंद्रात विद्यार्थी, तसेच कर्मचारी वगळता अन्य कोणालाही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. परीक्षा केंद्राच्या परिसरात पालकांची गर्दी झाली होती. दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत परीक्षा पार पडले. सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. पोलिसांनी विद्यार्थी, तसेच पालकांशी संवाद साधला, असे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×