Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ड्रायव्हर म्हणून काम का करत नाही, या गैरसमजातून झालेल्या वादात एकाने कार चालकाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा रोडवरील एसबीआय बँके समोर घडली. याप्रकरणी शशिकांत बळछत्रे (रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) याच्यावर येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलीप कचरू केदार (वय ३८, रा. सुखसागरनगर, कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्या; तीन आरोपी जेरबंद – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दि. २२ जूनला सकाळी साडेनऊ वाजता कात्रज-कोंढवा रोडवरील डॉमिनोज पिझ्झा शॉप समोर होते. तेथे फिर्यादींचे ओळखीचा आरोपी शशिकांत बळछत्रे आला. फिर्यादींकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या श्याम गवळी याला फिर्यादी आपल्याकडे काम करण्यास का नकार देत आहेत, असा गैरसमज आरोपीने करून घेतला. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने खाली पडलेला दगड उचलून फिर्यादींच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

हडपसरमध्ये गाडी पार्किंगवरून वाद;दांपत्याला बेदम मारहाण

गाडी पार्क करून घरी जात असताना आरोपीने रस्त्यात अडवून शिवीगाळ करत एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीला सिमेंटच्या ब्लॉकने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना हडपसर येथील ससाणेनगर भागात घडली आहे. याप्रकरणी गौरव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही, रा. नायकनवरे सोसायटी मागे, ससाणेनगर, हडपसर) आणि त्याच्या साथीदारावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन सोपानराव मंडाले (वय ४२, रा. नायकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दि. २१ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता आपली गाडी पार्क करून घरी जात होते. त्यावेळेस नायकनवरे सोसायटीच्या बाहेर आरोपी गौरव व त्याच्या साथीदाराने फिर्यादींना अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आरोपीने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादींच्या मानेवर मारला आणि डाव्या डोळ्याजवळ जोरदार बुक्की मारली. फिर्यादींची पत्नी माया ही भांडण सोडवण्यासाठी आली असता, आरोपींनी तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×