Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

दंडात्मक कारवाईची ‘पीडीएफ फाईल’ पाठवून तरुणाची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची ‘पीडीएफ फाईल’ पाठवून सायबर चोरट्यांनी एकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकीत गॅस सिलिंडर चोरणारा अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवा परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी १ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक ‘पीडीएफ फाईल’ पाठविली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे संदेशात म्हटले होते. त्यानंतर तक्रारदारांनी ही फाईल उघडली. फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकामधील गोपनीय माहिती मिळविली. त्याआधारे चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातील दोन लाख ४९ हजार ९९९ रुपये स्वत:च्या खात्यात जमा करुन घेतले. खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.

दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे संदेश पाठवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×