Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

खडकीत गॅस सिलिंडर चोरणारा अटकेत

खडकीत गॅस सिलिंडर चोरणारा अटकेत

२३ सिलिंडर जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील खडकी परिसरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून सिलिंडर चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २३ सिलिंडर जप्त करण्यात आले. किरण लक्ष्मण जांभळे (वय ३७, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. जांभळे याने साथीदारांच्या मदतीने सिलिंडरचोरीचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांनी दिली.

पुण्यात सराईतांची धरपकड, तिघांना बेड्या – सविस्तर बातमी 

खडकी बाजार परिसरात स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या टेम्पोतून सिलिंडर चोरीला जाण्याच्या घटना घडल्या हाेत्या. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता, सिलिंडर चोरी करणारा चोरटा जांभळे याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, उपनिरीक्षक चौगले, पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, ऋषीकेश दिघे, शशी संकपाळ, आबा केदारी, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, दिनेश भोये यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×