येरवड्यातील उड्डाणपुलावर अपघात; बसची ६ वाहनांना धडक

भरधाव वाहनाच्या धडके १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, चालक फरार

बस चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवड्यातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर भरधाव बसने एकापाठोपाठ ६ वाहनांना धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

येरवड्यातील गोल्फ क्लब चौकातून लाेहगाव विमानतळाकडे जाण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. गोल्फ क्लब चाैकातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा पूल बांधण्यात आला. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उड्डाणपुलावर किरकोळ अपघात झाल्यानंतर मोटार चालक थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या खासगी बसने वाहनांना धडक दिली. अपघातात दोघे जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंर उड्डाणपुलावरील वाहतूक गोल्फ क्लब चौकातून वळविण्यात आली. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×