Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

मुजोर चालकाची मुजोरी; दुचाकीस्वार शिक्षकाला बेदम मारहाण

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

खराडीतील घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीच्या आरशाला धक्का लागल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वार शिक्षकाला मोटार चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना खराडी भागात घडली. मोटार चालकाने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने तरुणावर वार केला. किरण केशव कुट्टे (वय ३५, रा. खराडी, नगर रस्ता) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यातील उड्डाणपुलावर अपघात; बसची ६ वाहनांना धडक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुट्टे हे खासगी शिकवणी घेतात. २६ नोव्हेंबर रोजी ते सायंकाळी दुचाकीवरुन शिकवणी वर्गात निघाले होते. खराडी भागात एका मोटारीच्या आरशाला दुचाकीचा धक्का लागल्याने मोटार चालकाने कुट्टे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘माझ्याकडे का बघतो ?’ अशी विचारणा करुन मोटार चालाकने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मोटारीत असलेल्या एका तरुणीने त्यांना शिवीगाळ केली. कुट्टे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मोटार चालकाने मोटारीतून तीक्ष्ण शस्त्र काढून त्यांच्यावर वार केला. त्यानंतर मोटार चालक तेथून पसार झाला, असे कुट्टे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक गोडसे तपास करत आहेत. दोन दिवसांपुर्वीच वारजे भागात दुचाकीचा धक्का लागल्यावरून एका तरुणाने दुचाकीस्वारासह त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ वादातून शहरात वाहन चालकांमध्ये हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×