Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक

पुण्यात मोबाईल चोरणार्‍याला अटक, ३५ मोबाईल जप्त

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दहशतवादी हल्ला, तसेच काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी पाषाण भागातील एका ज्येष्ठाची २० लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजोर चालकाची मुजोरी; दुचाकीस्वार शिक्षकाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार ज्येष्ठ नागरिक पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यंनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्याने ज्येष्ठाशी संपर्क साधताना समाज माध्यमातील व्हिडिओ काॅल सुविधेचा वापर केला होता. चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी संघटनांना पैसे पुरविणे, तसेच काळ्या पैसे व्यवहारात झाल्याची बतावणी चोरट्यांनी केली. या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली.

चोरट्यांनी त्यांना तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांच्या बँक खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी २० लाक ६५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलीस निरीक्षक ननावरे तपास करत आहेत.

तरुणीची १२ लाखांची फसवणूक

घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणीची १२ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्र्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरटयांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणीला दाखविले. तरुणींला सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर तरुणीला चोरट्यांनी ऑनलाइन कामात पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर तरुणीला परतावा देण्यात आला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×