जत्रेत जाणे पडले महागात, दीड लाखांचे दागिने चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – जत्रेत फिरण्यासाठी जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले असून, चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील १ लाख ५७ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ६ डिसेंबरला रात्री सव्वा सातच्या सुमारास केसनंद ता. हवेली याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी वाघोलीत राहणार्‍या महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वाघोलीत राहायला असून, ६ डिसेंबरला केसनंद गावच्या जत्रेनिमित्त त्या फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या पर्समधील १ लाख ५७ हजारांचे दागिने चोरून नेले. त्यानंतर महिलेने पोलीस तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनायक आहिरे तपास करीत आहेत.

हडपसरमध्ये नोकराचा १० लाखांच्या दागिन्यावर डल्ला

घरकाम करणार्‍या नोकराने तब्बल १० लाख ६५ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना मे २०२५ ते २८ नोव्हेंबर २०२५ कालावधीत हडपसरमधील डीपी रस्त्यावरील अर्बन बॅलन्समध्ये घडली आहे. याप्रकरणी ६७ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कामगाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×