Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

खराडी व हडपसर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खराडी भागात टँकरच्या धडकेत सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला, तसेच हडपसर भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी ज्येष्ठ महिलेचा पीएमपी बसच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी खराडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

खराडी भागात भरधाव टँकरच्या धडकेत सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (७ डिसेंबर) सकाळी आठच्या सुमारास घडली. सुनीता गजानन ताठे (वय ३४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी)असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वार महिलेचे नाव आहे. गजानन (वय ४०) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टँकरचालक गणेश ज्ञानोबा कांगणे (वय २३, रा. काळूबाईनगर, थिटे वस्ती, खराडी) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताठे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील टाकळगावचे रहिवासी आहेत. ताठे दाम्पत्य थिटे वस्ती परिसरातील चाळीत भाड्याने खोली घेऊन राहत आहेत. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सुनीता ताठे या सायकलवरुन खराडी परिसरातून निघाल्या होत्या. झेन्सार आयटी पार्कसमोर भरधाव टँकरने त्यांंना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टँकरचालक कांगणे याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.

पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात रविवारी सकाळी घडली. सोजर भीमराव कुंभार (वय ७२, रा. जगताप चाळ, हडपसर ) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंभार यांची विवाहित मुलगी धनश्री सोमनाथ कुंभार (वय ४०, रा. संतोषीमाता मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×