आगीच्या घटनांबद्दल जाणून घेतली माहिती
Marathinews24.com
पुणे – अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक विवेक श्रीवास्तव यांनी १६ एप्रिलला पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागाचे मुख्यालय व मारुंजी येथील पीएमआरडीए अग्निशमन केंद्रात भेट देत अग्निशमन दलाची माहिती घेतली. यावेळी पीएमआरडीए अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी जवानांकडून मानवंदना देत त्यांचे स्वागत केले. तसेच पुणे शहरात होणाऱ्या विविध आगीच्या घटनांबद्दल सांगितले.
पुण्यात चितळे बाकरवडीची डमी विक्री – सविस्तर बातमी
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार त्यानूसार अग्निशमन विभागाची पदे, अग्निशमन केंद्रे, अग्निशमन वाहने व उपकरणे आणि प्रशासकीय कामकाज याबद्दल अवगत केले.पीएमआरडीए अग्निशमन विभागाची कुमक व सेवा याविषयी सांगून जिल्ह्यात आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदतीसाठी नुकत्याच सुरु केलेल्या “पुणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स” बद्दल माहिती दिली. विवेक श्रीवास्तव यांनी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या असंख्य आगी व आपत्कालिन वर्द्या तसेच यंञसामुर्ग्री यावाषयी समाधान व्यक्त करत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे व जवानांच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कोण आहेत विवेक श्रीवास्तव
गुजरात केडरचे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक श्रीवास्तव हे सध्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. यापुर्वी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये विशेष संचालक म्हणून काम केले आहे. तसेच ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) चे प्रमुख देखील होते. हा ग्रुप पंतप्रधान आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवतात.