पर्वतीत भरधाव रिक्षा उलटून चालकाचा मृत्यू

Dive Ghat accident

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव रिक्षा उलटून रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती परिसरात घडली. लखन रामू अवघडे (वय २५, रा. भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत पाेलीस हवालदार विवेक आदक यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘जेसीबी बकेट’ डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक लखन अवघडे ४ डिसेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास पर्वती गाव परिसरातून भरधाव वेगाने निघाला होता. श्रद्धा ऑप्टीकल दुकानासमोर भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. अपघातात रिक्षाचालक अवघडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अवघडेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कोपनर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×