Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

जेवण न दिल्‍याने पित्‍यावर केला कोयत्‍याने हल्‍ला

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जेवण न दिल्‍याने दारूड्या मुलाकडून पित्‍यावर कोयत्‍याने हल्‍ला करून गंभीर जखमी करण्यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. प्रदिप अनिल साबळे (वय २५, रा. भवानी पेठ) असे गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍या मुलाचे नाव आहे. याबाबत वडील अनिल बबन साबळे (वय ५०, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. ८ डिसेंबरला एक वाजता हा प्रकार घडला.

पुण्यातील गुन्हे शाखेचा हवालदार सचिन पवार निलंबित – सविस्तर बातमी

तक्रारदार व त्‍यांची पत्‍नी साफ सफाईची कामे करतात. त्‍यांचा मुलगा प्रदिपला दारूचे व्यसन असून कोणत्‍याही कारणाने ते आई वडीलांना मारहाण करत असतो. ८ डिसेंबरच्‍या रात्री एक वाजता तो दारू पिऊन घरी आला. त्‍यावेळेस त्‍याचे आई वडील दोघेही झोपी गेले होते. यावेळी तो जेवण मागू लागला. त्‍यावेळी त्‍याच्‍या वडीलांनी त्‍याला तु तुझे जेवण घेऊन खा असे म्‍हटले. याच्‍या रागातून त्‍याने वडीलांना व आईला शिवीगाळ केली. त्‍यावेळी त्‍याला वडीलांनी शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली असता लोखंडी कोयत्‍याने वडीलांच्‍या डोक्‍यात मारून त्‍यांना भिंतीवर ढकलून दिले. तसेच आईलाही मारूनच टाकतो अशी धमकी दिली. नंतर तो घरातून निघून गेला. पुन्‍हा सकाळी सहा वाजता तो घरी आला आणि त्‍याने घरातील सामान फेकून दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×