Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यातील गुन्हे शाखेचा हवालदार सचिन पवार निलंबित

बुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी केले निलंबित

marathinews24.com

पुणे – संशयित आरोपीच्या साथीदाराला पोलीस हवालदाराने फोन करुन चौकशी केल्यामुळे तो सावध झाला. त्यामुळे आरोपीला अटक करण्यास विलंब झाल्याचा ठपका ठेउन गुन्हे शाखेतील पोलीस अमलदाराला निलंबित केले आहे. हवालदार सचिन दिलीप पवार असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. पोलीस यंत्रणेचा अनावश्यक वापर होऊन प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण झाल्यामुळे हवालदाराला पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी निलंबित केले आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनीट सहामध्ये पोलीस हवालदार सचिन पवार हे कार्यरत होते. मागील वर्षी बाबा सिद्धिकी यांची हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध आल्याने पंजाब पोलीस तपास करत होते. बिश्नोई गँगने पंजाबातील गारमेंट व्यावसायिकाचीही हत्या केली होती. त्यातील गुन्हेगारांशी संपर्कात अमोल गायकवाड हा गुन्हेगार संशयित होता. त्याचा शोध घेण्यासाठी पंजाब पोलीस पुण्यात आले होते. त्यांच्या मदतीला युनीट सहाची मदत देण्यात आली होती. त्यावेळी पंजाब पोलिसांनी हवालदार सचिन पवार यांना आरोपीच्या साथीदाराला फोन करून बोलावून घेण्यास सांगितले होते.

सांगण्याप्रमाणे पवारने गायकवाडच्या साथीदाराला फोन केला होता. त्यामुळे सावध होउन त्याने मोबाइल बंद केला. काही दिवसानंतर त्याला कोल्हापूरमध्ये अटक झाली. बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील तो अटक करण्यात आला. फोन आल्यामुळे मी सावध झालो. त्यानंतर मोबाईल बंद करुन पळून गेलो अशी कबुली त्याने चौकशीत दिली. आरोपीशी संशयास्पद पद्धतीने संपर्क साधल्यामुळे त्याने मोबाईल बंद केला. आरोपीला अटक करण्यात उशीर झाला. पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी पोलीस हवालदार पवारला निलंबित केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×