पुण्यातून वादग्रस्त अधिकारी रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात
Marathinews24.com
पुणे – बीडमधील वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे, सरपंच संतोष देशमुख हत्या, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर नवनवीन आरोप करीत आहेत. यादरम्यान कासले यांच्यावर प्रकरणात बीड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कासले हे पसार झाल्यानंतर १७ एप्रिलला रात्री पुणे विमानतळावर दाखल झाले होते. अखेर १८ एप्रिलला बीड पोलिसांच्या १३ जणांच्या पथकाने स्वारगेट परिसरातील हॉटलेमध्ये धाव घेत कासले यांचा ताबा घेतला आहे.
वाल्मीक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर – सविस्तर बातमी
दिल्ली येथून पुणे विमानतळावर रणजीत कासले यांचे गुरुवारी आगमन झाल्यानंतर प्रसारासाठी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केले. त्यानंतर स्वारगेट येथील एका हॉटेलमध्ये राहण्यास गेले होते. मात्र पहाटेच्या सुमारास रणजीत कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.