Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शिराळा तालुक्यात बिबट्यांचा वाढता धोका; स्वसंरक्षणासाठी उभारले दहा फुटी तारकुंपण

बिबट्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय

marathinews24.com

सांगली – शिराळा तालुक्यात बिबट्या तसेच अन्य प्राण्यांचा वावर प्रमाणाबाहेर वाढला आहे. हे प्राणी आता लोकवस्तीच्या अगदी जवळ वावरत आहेत. शेतातील घरांना या प्राण्यांचा फार धोका निर्माण झाला आहे. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी आता नागरिकच काळजी घेताना दिसत आहेत.

‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा’; पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‘आतल्या गाठीची बाजी – सविस्तर बातमी

शेतातील अनेक घरांना आता तारांचे दहा फूट उंच कुंपण घातले जाऊ लागले आहे. शिराळा तालुक्यात आता बिबटे घराघरांपर्यंत पोहोचले आहेत. गावांच्या आजूबाजूला असलेल्या उसाच्या फडात बिबट्यांचे वास्तव्य आहे. ऊस हाच बिबट्यांचा अधिवास बनला आहे. रात्रीच्या वेळेला हे बिबटे अगदी लोकवस्तीमध्ये फिरत आहेत. शेतालगत असलेल्या घरांना याचा विशेष धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना या बिबट्यांची भीती वाटत आहे.

त्यातच परिसरात पाळीव जनावरे, कुत्री यासह माणसांवरच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून ठोस काही होत नसल्याने आता नागरिकच सावध झाले आहेत. स्वसंरक्षणासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. मेंढपाळांना तर रात्री शेतात सौरदिवे लावावे लागत आहेत. जागरण करावे लागत आहेत.

नागरीकांनी हे केले उपाय

वस्तीच्या बाहेर रात्रभर विजेचा दिवा, शेतातील घरांना तारांचे कुंपण, जनावरांच्या वस्त्या बंदिस्त, रात्री शेतात टॉर्च, काठी व ध्वनिनिक्षेपकांचा वापर, रात्री निर्जन रस्त्यावरून प्रवास करताना हॉर्न वाजवणे, हे सर्व उपाय करून नागरिक सावधगिरीने वास्तव्य करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×