Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील गॅगस्टरांच्या कुटूंबियांना अजित पवारांकडून उमेदवारी

पुण्यातील गॅगस्टरांच्या कुटूंबियांना अजित पवारांकडून उमेदवारी

गँगस्टर गजा मारणेच्या पत्नीला, कुख्यात आंदेकराच्या मुलीसह भावजयला दिला एबी फॉर्म

marathinews24.com

पुणे – राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास, त्याला बिनधास्त टायरमध्ये घाला. कोयता गँग संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी खपवून घेणार नाही, अशी वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील कुख्यात गँगस्टरांच्या कुटूंबियांना महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म देउन उमेदवारी निश्चीत केली आहे. त्यामुळे एकीकडे भाषणावेळी केली जाणारी पतंगबाजी पवारांकडून प्रत्यक्षात अमलात का आणली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नववर्षानिमित्त लोणावळा परिसरात वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

पुण्यातील कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी एबी फॉर्म देउन पक्षाची उमेदवारी निश्चीत केली आहे. तर कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी आंदेकर यांनाही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुण्यात नामांकित दोन गँगस्टरांच्या कुटूंबियाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाने ) पायघड्या घातल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबियांना उमेदवारी का देण्यात आली, अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, जर आंदेकर कुटूंबियांना उमेदवारी दिली तर आपण आत्मदहन करू, असा इशारा आंदेकरची मुलगी कल्याणी कोमकर हिने नुकताच दिला होता.

गुंड गजा मारणे याच्या पत्नीला एबी फॉर्म

कुख्यात गुंड गजा मारणे कोथरूडमध्ये राहायला असून, त्याची पत्नी जयश्री मारणे हिला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेवादी जाहीर केली आहे. दरम्यान, विविध गंभीर गुन्ह्यात पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणेविरूद्ध वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला होता. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पदाधिकार्‍याला बेदम मारहाण केल्याप्रकरणात मारणे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वी त्याची न्यायालयाने अटी-शर्थीवर जामीन देउन सुटका केली होती. त्यामुळे आता पत्नी जयश्रीच्या प्रचाराला कुख्यात गुंड गजा मारणे फिरणार का, पत्नीचा प्रचार करताना मतदारांवर दबाव टाकणार का, पोलिसांसह न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

गँगस्टर आंदेकर कुटूंबियानाही पायघड्या

कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्याविरूद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याने नुकताच स्वतःच्या नातवाचा खून घडवून आणला आहे. दरम्यान, त्याची मुलगी सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. नाना पेठ, भवानी पेठेसह संपुर्ण पुणे शहरात दहशतीच्या जोरावर संपत्ती लुटणार्‍या कुटूंबियाना पवार गटाने उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांनी कसब पणाला लावले होते. विशेषतः गुंड गजा मारणेला अटक करणे, आंदेकर टोळीविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतरही राष्ट्रवादीने गँगस्टरांच्या कुटूंबियांना उमेदवारी दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

म्हणून २४ तासात बाबा बोडकेचा प्रवेश केला होता रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसने यापुर्वी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाबा बोडकेला पक्षात प्रवेश दिल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, २४ तासांत पक्षाने बाबा बोडके याचा प्रवेश रद्द करीत चर्चा थांबवली होती. त्यामुळे यापुर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारांना पायघड्या टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×