Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चर

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

हडपसरमधील अमनोरा पार्कटाऊन परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – हडपसरमधील अमनोरा पार्कटाऊन परिसरात भाड्यावरून झालेल्या वादातून रॅपिडो चालकाला तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चालकाच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन भारती (वय २७, रा. मांजरी बुद्रुक) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.

चेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन भारती (वय २७, रा. मांजरी बुद्रुक) हे रॅपिडो कॅब सेवा देत होते. २३ जूनला पहाटे अमनोरा पार्कटाऊन येथील ट्रेन्डी टॉवरसमोर शुभदा ताटे यांनी त्यांच्या कारची बुकिंग केली होती. मीटरप्रमाणे भाडे लागेल, असे चालकाने सांगितल्यानंतर संबंधित प्रवाशांनी बुकिंग रद्द करून दुसरी कॅब बुक केली. यानंतर लखन भारती यांनी दुसऱ्या कॅब चालकाला रॅपिडोच्या बुकिंगप्रमाणे प्रवास परवडतो का, अशी विचारणा केली. त्या चालकानेही संबंधित महिलेला घेऊन जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून शुभदा ताटे, किरण ताटे आणि त्यांच्या मुलाने मिळून लखन भारती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मारहाणीत भारती यांच्या हात, तोंड, छाती तसेच शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली असून उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×