Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाघोली परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – शहराजवळ केसनंद-वाघोली रस्त्यावर भरधाव सेप्टी टँकरची दुचाकीला धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला. त्यानंतर टँकरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाबुलाल रामाजी चौधरी (वय ४८) असे अपघातातील ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश समाराम चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाघोली पोलिसांनी टँकरचालक किरण बाजीराव राठोड (वय ५१) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बाबूलाल चौधरी हे २४ जूनला दुपारी साडेचारच्या सुमारास केसनंद वाघोली रस्त्यावरून जात होते. त्यावेळी टँकर चालकाने दिलेल्या धडकेत बाबूलाल खाली पडला. टँकरचालक किरण राठोड याने वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. टँकरने बाबुलाल चौधर यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर चौधरी रस्त्यावर पडले असता टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×