Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पैसासाठी महिलेचा छळ; बाळासह घराबाहेर काढत लाथा बुक्क्यानी केली मारहाण

पैसासाठी महिलेचा छळ; बाळासह घराबाहेर काढत लाथा बुक्क्यानी केली मारहाण

केज तालुक्यातील घटना;तिघांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड – माहेरहून १५ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या लोकांनी महिलेला चक्क उपाशी ठेवून मारहाण केली. तिला बाळासोबत घराबाहेर काढत मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासू ,सासऱ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील रहिवाशी शीतलचा विवाह तीन वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडजी येथील रहिवाशी अजय रामेश्वर जाधवर यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक वर्ष सासरच्यांनी शीतलला चांगलं सांभाळलं. परंतु, पती अजय जाधवरला ऑनलाइन गेमची सवय लागल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खासगी सावकारांचं कर्ज झाले होते. त्यानंतर त्याने व त्याच्या वडील रामेश्वर अर्जुन जाधवर (सासरा) आणि रमा रामेश्वर जाधवर (सासू) यांनी शीतलचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला सतत मानसिक त्रास दिला जाऊ लागल्याने शीतलने आपल्या आई-वडिलांना सासरची मंडळी मला मानसिक त्रास देत असल्याची सांगितले.

तिच्या घरच्यांना असं वाटलं, की कदाचित कर्ज झालं असेल म्हणून तिच्या सासरचे लोक चिडचिड करत असतील, त्यांना आपण सावरून घेऊ म्हणून ठरवलं. दीड महिन्यापूर्वीच शीतलच्या आई- वडिलांनी त्यांची जमीन विकून ३ लाख रुपये शीतलच्या सासरच्या लोकांना दिले होते. परंतु, त्यानंतरही पती अजय जाधवर हा पत्नी शीतलला कॉल करून खासगी सावकारांना कॉलवर बोलण्यासाठी जबरदस्ती करत होता. नाही बोललीस तर बाळासह तुला जीवे मारून टाकीन म्हणून धमकी देत होता. याच कारणावरुन शीतलला सारखा मानसिक त्रास सहन करावा लागत. या प्रकरणाने शीतलचे आई-वडील तणावाखाली होते. अशी सर्व माहिती फिर्यादीत दिली आहे.

माहेरहून १५ लाख रुपये घेऊन ये असं म्हणत शीतलला उपाशी ठेवून, शिवीगाळ करून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत १६ नोव्हेंबर २०२५ रोजी तिला घराबाहेर काढलं. याप्रकरणी अखेर शीतल जाधवर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×