Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शहरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कात्रज, वाघोलीत अपघात

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दुचाकीवरील महिलेसह पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली, तसेच कात्रज भागात अपघाताच्या घटना घडल्या.

ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिने लुटणारा गजाआड – सविस्तर बातमी 

कात्रजमधील जांंभुळवाडी रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आर्यन रामदास आधवडे (वय १८, रा. काका पवार तालमीजवळ, जांभुळवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आर्यन याचे काका मोहन हरिभाऊ आधवडे (वय ४०, रा. अमृता सिटी, लिपाणे वस्ती, जांभुळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि त्याचा मित्र अनिकेत चोरगे हे जांभुळवाडी रस्त्याने ६ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने आर्यनला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तो मरण पावला. पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करत आहेत.

नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिमा अरुण नोनंदकर (वय ३४, रा. दत्तनगर, दिघी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अरुण हनुमंत नोनंदकर (वय ३८) जखमी झाले आहेत. अरुण यांनी याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अरुण आणि त्यांची पत्नी प्रतिमा हे ६ जानेवारी रोजी नगर रस्त्याने दुपारी एकच्या सुमारास निघाले होते. आव्हाळवाडी फाटा चौकात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात सहप्रवासी प्रतिमा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारांपूर्वीच त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×