विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणे अंगलट, पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा
marathinews24.com
पुणे – बिग बॉस फेम अभिनेता अभिजित बिचकुले यांनी पुण्यात दुचाकी चालविताना वाहतूक नियम मोडल्याचे व्हायरल व्हिडिओतुन दिसून आले आहे. याप्रकरणी एका सामजिक कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल करून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुणे वाहतूक विभागाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई.
शेअर बाजारातील गुंतवणूक पडली 23 लाखांना सविस्तर बातमी
अभिनेता अभिजीत बिचकुले दुचाकीवरून विरुद्ध दिशेने वाहन चालवीत असल्याचे दिसून आले आहे. मध्यवर्ती भागातून त्यांनी दुचाकी विरुद्ध दिशेने चालविली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बिचकुले यांच्या वाहन चालविल्याच्या कृतीवर प्रतिक्रिया देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बेशिस्त वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाई केली जाते. अशीच कारवाई अभिनेते बिचकुले यांच्याविरोधात करण्यात आली आहे.
कोण आहेत अभिजित बिचकले
अभिजित बिचकुले हे बिग बॉस मराठी आणि हिंदी शोमधून प्रसिद्ध झाले असून त्यांनी २०२४ मध्ये सातारा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे.