येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ८ लाखांचे कपडे चोरल्याचे उघडकीस
marathinews24.com
पुणे – चोर नेमकी कशाची चोरी करेल, याचा काही ताळमेळ राहिला नाही. अशाच एका चोरट्याने कपड्यांच्या दुकानातून चक्क महिलांचे अंडरगारमेंट (अंर्तवस्त्र), नाईट पॅन्ट चोरल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल ८ लाख रूपयांची कपडे चोरल्याप्रकरणी संबंधित चोरट्याविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२४ ते १९ एप्रिल २०२५ कालावधीत कल्याणीनगरमधील एस.एल. इंटरप्रायजेस दुकानात घडली आहे.
मोजमाजा करण्यासाठी चोरत होते दुचाकी पोलिसांकडून 10 दुचाकी जप्त – सविस्तर बातमी
गणपत डांगी (रा. सनसिटी रस्ता, सिंहगड) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. सुरेंद्रकुमार राजेंद्रप्रसाद शर्मा (वय ३४, रा. मांजरी बुद्रूक, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुरेंद्रकुमार यांचे कल्याणीनगर परिसरात एस.एल. इंटरप्रायजेस नावाचे कपडे विक्रीचे दुकान आहे. आरोपी डांगी हा वितरकाकडून ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने दुकानात वेळोवेळी येत होता. जून २०२४ ते एप्रिल २०२५ कालावधीत त्याने दुकानात महिलांचे अंडर गारमेंट, टी-शर्ट, नाईट पॅन्ट, पुरूषांचे कपडे चोरले. जवळपास ८ लाखांची कपडे त्याने चोरून नेली होती. याप्रकरणी सुरेंद्रकुमार यांना संशय आल्यांनतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी डांगीविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे प्रकरणाचा तपास करीत आहेत.