Breking News
वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वनभारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकरपुणे ग्रँड टूर सायकल शर्यतीला जगातील चौथी ग्रँड टूर बनविण्यासाठी यूसीआय करणार सहकार्य

सहा वर्षांच्या मुलासह महिलेची इमारतीतून उडी मारून आत्महत्या

कात्रजमधील आंबेगाव भागातील घटना

marathinews24.com

पुणे – महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी कात्रजमधील आंबेगाव परिसरात घडली. महिलेेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नणंदेच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१), विष्णू शशिकांत देशमुख (वय ६) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकांची नावे आहेत. आत्महत्या प्रकरणाची नोंद आंबेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

जेजुरीत भीषण अपघात, ८ जण ठार, चौघे जखमी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडीत शिक्षिक होत्या. त्यांचे पती शशिकांत हे एका बँकेत नोकरी करतात. देशमुख कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून, विष्णू त्यांचा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने पाचव्या मजल्यावरुन सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह उडी मारली. त्यावेळी मयुरीचे पती घरात नव्हते. आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीतील आवाारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोालीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने घटनास्थळी आले. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मयुरीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. नणंदेच्या त्रासामुळे आत्महत्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×