Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा तरुण अटकेत

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा तरुण अटकेत

समर्थ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला तरुण लोणावळ्यातील असून, त्याच्याकडून दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.साहिल रहीम शेख (वय २१, रा. सिद्धार्थनगर, छत्रपती शिवाजी चौक, लोणावळा) असे अटक करण्यात् आलेल्याचे नाव आहे. मंगळवार पेठेतून दुचाकी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती.

दुचाकी चोरी प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या चोरट्याचा माग पोलिसांकडून काढण्यास येत होता. पोलीस कर्मचारी अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे यांनी मंगळवार पेठेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर पसार झालेल्या शेखला पोलिसांच्या पथकाने वडगाव शेरी भागातून अटक केली. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, संतोष पागार, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, ओैचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×