Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

मित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटक

मित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटक

आंबेगाव पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे– किरकोळ वादातून मित्राचा खून करुन पसार झालेल्या तरुणाला आंबेगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून अटक केली.
सूरज गणेश सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दीपक बंडगर (वय २१, रा. नऱ्हे) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा़ योगमुद्रा बिल्डिंग, भुमकर वस्ती, नऱ्हे) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़.

ओैंधमधील वस्त्रदालनातून कपडे चोरीला – सविस्तर बातमी

दीपक, सूरज आणि राेहित हे मित्र आहेत. सूरज आणि रोहित यांच्यात वाद झाले होते. १४ जून रोजी सूरज, दीपक, रोहित हे जांभुळवाडी तलाव परिसरात फिरायला गेले होते. रोहित आणि सूरज तलावाच्या बंधाऱ्याजवळ थांबून सिगारेट ओढत होते. दीपक याला धुराचा त्रास होत असल्याने तो लांब थांबला होता. त्यावेळी रोहित आणि सूरज यांच्यात पुन्हा वाद झाला. सूरजने रोहितच्या डाेक्यात दगड घातला. या घटनेत रोहित गंभीर जखमी झाल्याने दीपक घाबरला. तो घरी गेला.

दुसऱ्या दिवशी घाबरलेल्या दीपकला आईने विचारणा केली. तेव्हा त्याने रात्री सूरज आणि राेहित यांच्यात वाद झाले. सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातल्याची माहिती त्याने आईला दिली. त्यानंतर दीपक आंबेगाव पोलीस ठाण्यात गेला. त्याने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रोहित बंधाऱ्याजवळ मृतावस्थेत पडला होता. चौकशीत सूरजने रोहितच्या डोक्यात दगढ घालून खून केल्याची माहिती मिळाली.

सूरजचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात तो इंदूरला पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला इंदूरमधून ताब्यात घेले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे, उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे, सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×