Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

भाजपचा पदाधिकारी ओंकार कदमसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

भाजपचा पदाधिकारी ओंकार कदमसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यााला मानसिक त्रास

marathinews24.com

पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याचा पाठलाग, तसेच अवमानास्पद टिप्पणी करुन मानसिक त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या पदाधिकारी ओंकार कदम याच्यासह सहाजणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैमनस्यातून दोन तरूणांवर कोयत्याने वार – सविस्तर बातमी 

कदम आणि साथीदारांनी कोणतेही शासकीय काम नसताना आरोग्य विभागाच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयीन सहकारी उपस्थित असताना त्यांनी अवमानस्पद टिप्पणी केली. अश्लील शब्द उचारले. कदम आणि सहकाऱ्यांनी पाठलाग केला. कदम आणि साथीदारांच्या कृत्यामुळे मानसिक त्रास झाला, तसेच कार्यालयत जाण्यास भीती वाटत आहे, असे महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कदम आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे.. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले.

घटनंची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ओंकार कदम आणि साथीदारांना महापालिका भवन आणि महापालिकेशी संबंधित सर्व मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×