Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

वैमनस्यातून दोन तरूणांवर कोयत्याने वार

वैमनस्यातून दोन तरूणांवर कोयत्याने वार

टोळक्याविरुद्ध गुन्हा, सातारा रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून दोन तरूणांवर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीजवळ घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव नाईकनवरे (वय १७, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी), कार्तिक गायकवाड (वय १६, रा. संभाजीनगर, धनकवडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. शीतल सचिन नाईकनवरे (वय ४०) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडीत शिवशाही बसचा अपघात; चालकासह प्रवासी जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकनवरेचा शंकरमहाराज वसाहत परिसरातील काहीजणांशी वाद झाला होता. नाईकनवरे आणि गायकवाड हे सोमवारी (१६ जून) रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरुन घरी निघाले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीजवळ टोळक्याने त्यांना अडविले. नाईकनवरे आणि त्याचा मित्र गायकवाड यांच्यावर टोळक्याने कोयत्याने वार केले. टोळक्याने नाईकनवरे याच्या डोक्यात कोयता मारला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×