अर्थमंत्र्यांकडून महाज्योतीला दुय्यम वागणूक-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी महा ज्योतीचे दायित्व द्यावे

marathinews24.com

पुणे – बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांसाठी शासनाकडून समान धोरन लागू करण्यात आले. परंतु या धोरणामध्ये समानता दिसून येत नाही. अर्थमंत्री बार्टी आणि सारथीच्या तुलनेत महाज्योतीला दुय्यम वागणूक दिली जात आहे. महाज्योतीला संस्थेला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी तसेच महाज्योतीचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी घावे, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन – सविस्तर बातमी 

याबाबत बोलताना हाके म्हणाले, सारथी संस्थेच्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनाकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे. परंतु महाज्योतीच्या संशोधक विद्याथ्यांना २५ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यानाची म्हणजे ५ महिने ६ दिवसांची अधिछात्रवृत्ती देण्यात आली. सारथी संस्थेला निधी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होतो परंतु महाज्योती संस्थेला अधिवेशनात पुरवणी मागणी करावी लागते. दोन वेळा ही मागणी नाकारली जाते व कारण ही दिले जात नाही.

सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्या करीता निधी नसल्याने विद्यार्थ्यानी आंदोलन करतात निधी मंजूर होतो त्याच्या वाटपाची सुरवात ही करण्यात आली पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी अभावी अध्याप एका ही विदायार्थ्याला नोंदणी दिनाक पासून अधिछात्रवृत्ती देण्यात आली नाही.

ससाणे म्हणाले, महाज्योती संस्थेला स्वतंत्र जागा अपेक्षित आहे. त्याच बरोबर ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला अध्याप अध्यक्ष दिलेला नाही. या महामंडळाला जागा ही शासनाने उपलब्ध करून द्यावी. त्याच बरोबर महाज्योतीचे विद्यार्थी पिचडी करीत असून त्यांना अधिछत्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी. शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून महाज्योती संदर्भातील सर्व मागण्या मान्य कराव्यात. त्याच बरोबर सारथी संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीच्या तीन पट अधिक निधी महाज्योतला देण्यात यावे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

कारखान्याची निवडणूक शोभत नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहणे अजित पवारांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. त्याच बरोबर कारखान्यांना निधी देण्यास अर्थमंत्र्यांकडे पैसा आहे मात्र महाज्योतीच्या पीचडी धारकांना अधिछत्रवृत्ती देत नाहीत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top