पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खून

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून

गोखलेनगरमधील घटना

marathinews24.com

पुणे – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरूणाला लोखंडी, लाकडी दांडक्याने मारून खून केला आहे. ही घटना १८ जूनला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोखलेनगरातील एकतानगर सोसायटी परिसरात घडली आहे. हर्ष मच्छिंद्र जाधव (वय २०, रा. गोखलेनगर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन ते चार जणांविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि हर्ष जाधव यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून तीन ते चार जणांनी १८ जूनला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रिक्षात बसलेल्या हर्षला गाठले.. त्यांनी रिक्षा बसलेल्या हर्षला बाहेर ओढून त्याला लोखंडी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्याला वीटेने मारून गंभीररित्या जखमी करीत त्याचा खून केला. दरम्यान, आरडा ओरडा ऐकून जवळच्या लोकांनी हर्षला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×