Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

Pune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

Pune Road Accident News

कात्रज, लोणी काळभोर भागात अपघात

marathinews24.com

पुणे – शहरातील वेगवेगळ्या अपघातांत दुचाकीस्वार तरुणासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज – देहूरोड बाह्यवळण मार्ग, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात अपघाताच्या घटना घडल्या. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मेहबूब युसूफ शेख (वय ३१, रा. श्रीराम काॅलनी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अब्दुल शेख (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मेहबूब हे मंगळवारी (३ नाेव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावरु निघाले होते. वर्धमान गार्डन सोसायटीसमोर भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार मेहबूब गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रक चालक पसा झाला. गंभीर जखमी झालेल्या मेहबूब यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव तपास करत आहेत.

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिवानी प्रतीक लोंढे (वय ३०, रा. शारदा सोसायटी, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार श्रद्धा प्रशांत लोंढे (वय २७) या जखमी झाल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार श्रद्धा आणि त्यांची जाऊ शिवानी या ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातून निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर रस्त्यावर कदमवाक वस्ती परिसरात भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी शिवानी, तसेच त्यांची दुचाकीस्वार जाऊ श्रद्धा या जखमी झाल्या. गंभीर जखमी झालेल्या शिवानी यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस कर्मचारी सोमनाथ नाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×