Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना नवी पेठेतील राजेंद्रनगर परिसरात घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५७ वर्षीय महिला राजेंद्रनगर परिसरात राहायला आहेत. मंगळवारी (१६ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रादार महिला राजेंद्रनगर परिसरातील सोनाली मटण शाॅपसमोरील गल्लीतून निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा गल्लीतून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. चोरट्याचे वय अंदाजे २० ते २५ वर्ष असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

शाळेतून लॅपटाॅप, मोबाइल चाेरीला

बिबवेवाडी भागातील एका शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटाॅप आणि मोबाइल असा मुद्देमाल चोरुन नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीत नोबल इंग्लिश प्रायमरी स्कूल आहे. चोरट्यांनी शाळेच्या आवारातील कार्यालयाचे कुलूप तोडून लॅपटाॅप, मोबाइल असा ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×