पुण्यात बाथरूमच्या काचा काढून कैद्याने केले पलायन

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने ससून रुग्णालयातून पलायन

marathinews24.com

पुणे – स्वच्छतागृहाच्या काचा काढून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने ससून रुग्णालयातून पलायन केले आहे. चित्रपटालाही लाजवेल असे कैद्याने पलायन केल्याची घटना सोमवारी (दि.१९) संध्याकाळी पाच वाजता घडली आहे. समीर गौतम कुचेकर (रा. सातारा जिल्हा) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.

पुण्यात विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या कार्यालयात चंदन चोरट्यांचा डल्ला – सविस्तर बातमी 

संबंधित कैदी ससून मधील आयसीयू वॉर्डच्या बाथरूममधील खिडकीच्या काचा काढून दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरून फरार झाला आहे. आरोपी कुचेकर हा सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यातील आरोपी असून,पलायनाची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीत शोधमोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपी सापडल्यास नियंत्रण कक्षाला तात्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस हवालदार सावळकर यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. आयसीयू वॉर्डसारख्या संवेदनशील ठिकाणाहून कैदी पळून जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी व तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×